Download App

पुणे मेट्रोला ब्रेक? येरवडा-रामवाडी स्थानके दुसरीकडे हलवा; स्थानिकांची ‘महामेट्रो’ला नोटीस

Pune Metro : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर पुण्यात मेट्रो सुसाट धावू (Pune Metro) लागली. पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायक करणाऱ्या या महामेट्रो रेल्वेला नगर रोडवरील येरवडा, रामवाडी भागात मात्र ब्रेक लागला आहे. येरवडा स्थानकाचे जिने रस्त्यात येत असल्याने महापालिकेने त्यात बदल सुचवला. तर दुसरीकडे नगर रस्त्यावरील नागरिकांनी येरवडा आणि रामवाडी स्थानके दुसरीकडे हलविण्यासाठी महामेट्रोलाच नोटीस धाडली. यामुळे मेट्रोचे पुढील काम रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

रूबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील येरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर येत होते. महामेट्रोकडू यासाठी खांब उभारणीचे काम केले जात होते. मात्र येथील नागरिकांनी वाहतूक कोंडीचे कारण देत या कामाला विरोध केला. त्यामुळे महापालिकेने घेत येथील जिने दुसरीकडे हलविण्याचा पर्याय महामेट्रोला दिला. त्यानंतर महामेट्रोने यात काही बदल केले. याचा फटका महामेट्रोला बसला. कारण हे बदल करताना महामेट्रोला येथे सुरू असलेले जिन्यांचे बांधकाम पाडावे लागले. आता हे काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे.

Pune Metro : पंतप्रधानांनी केलं पुणे मेट्रोचं लोकार्पण; कसे असणार तिकीट दर? जाणून घ्या..

येरवडा स्थानकाचा तिढा सुटल्यानंतर नगर रस्त्यावरील काही नागरिकांनी महामेट्रोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नगर रस्ता नागरिक मंचाचे विंग कमांडर आशुतोष माश्रूवाला, कनीज सुखरानी आणि उमेश मगर यांनी ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी या नोटिशीत म्हटले आहे, की येरवडा आणि रामवाडी मेट्रो स्थानके रस्ता विकास आराखड्यात येत आहेत. या स्थानकांचे बांधकाम रस्त्यात येत असल्याने वाहतूत कोंडी होत आहे. या भागात अतिक्रमणेही आहेत. त्यामुळे ही स्थानके खासगी किंवा सरकारी जागेत हलवावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

तसं पाहिलं तर या भागातील लोकांच्या आक्षेपाची आणखीही काही कारणं आहेत. या स्थानकांमुळे भविष्यात येथे वाहनांची संख्या वाढणार आहे. महामेट्रोने नगर रस्त्यावर सात मीटर अतिक्रमणही केलं आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्थानकांसाठी पार्किंगचेही नियोजन केले नाही. नगर रस्त्याच्या विकास आराखड्यावर स्थानकांचे अतिक्रमण अशी काही कारणे आहेत. ज्यामुळे या कामाला विरोध केला जात आहे. या गोष्टींचा विचार करता महामेट्रोचे येथील काम आणखी काही दिवस रखडण्याची शक्यता आहे.

Pune Metro : स्वप्न पूर्ण होणार! मेट्रो ट्रेन पिंपरीपासून आता थेट निगडीपर्यंत, केंद्राची मंजुरी

Tags

follow us