हर्षदा देशमुख-जाधवांची आघाडी, स्मिता जाधव पिछाडीवर; पुणे पदवीधर मतदारसंघात चुरस!

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर असून भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर आहेत.

Smita Jadhav

Smita Jadhav

Pune MLC Result : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव (Pune MLC Result) या आघाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव या पिछाडीवर असल्याची माहिती आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली होती.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तर भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव पिछाडीवर आहेत. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर आहेत. या दोन्ही
उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. अंतिम निकाल समोर आलेला नाही. या निवडणुकीत नेमका विजय कुणाचा होईल? याचीच उत्सुकता लागलीयं.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा गाजावाजा झाला होता. स्मिता जाधव यांनी तंत्रज्ञान, व्यवस्थापन, शिक्षण अशा तीनही शाखांमध्ये उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांना तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राची खूप चांगली जाण आहे. तसेच त्यांनी शिक्षण विषयात डॉक्टरेट पूर्ण केले आहे. त्यांना शैक्षणिक प्रशासनाचा सखोल अभ्यास आहे. भाजपकडून डॉ. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी स्मिता जाधव यांच्यासारख्या अभ्यासू उमेदवाराची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तशाच तगड्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हर्षदा देशमुख-जाधव या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत.

Exit mobile version