Pune MP Muralidhar Mohol silence on Crime in Pune : पुण्यात अलीकडेच वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहर हादरले आहे. टोळ्यांच्या वादातून दिवसा ढवळ्या होत असलेले हल्ले आणि गोळीबारामुळे नागरिक भयभीत आहेत. आंदेकर–कोमकर टोळी संघर्षानंतर घायवळ टोळीने केलेल्या गोळीबाराने सामान्य पुणेकर हादरला. त्याचबरोबर टिपू पठाण टोळीची हालचालही पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे.
अभिनेत्री स्मिता गोंडकरचं बिकनीवर फोटोशूट, फोटोंमध्ये अदकरीचा कहर; चाहते घायाळ
या पार्श्वभूमीवर, पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय राज्यमंत्री बनलेले आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ मात्र शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा सुरु आहे.रविवारी 2 नोव्हेंबर 2025 स. प. महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी मात्र “आज मॅरेथॉनबद्दल बोला” असं सांगत विषय टाळला आणि पत्रकार परिषदेतून बाहेर पडले.
प्राईम व्हिडिओ अन् ऋतिक रोशनची HRX फिल्म्स साकारणार थ्रिलर सीरिज लवकरच सुरू होणार स्टॉर्म’चं शूटिंग
पत्रकारांनी वारंवार “खासदार साहेब, पुण्याची काय परिस्थिती आहे, गुन्हेगारीवर काही भूमिका मांडणार का?” अशी विचारणा केली, तरीही मोहोळ यांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला. त्यामुळे “गुंड परदेशात पळत आहेत आणि खासदार मात्र मॅरेथॉनवरच बोलत आहेत का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
नवाजुद्दीन साकारणार अंध व्यक्तीची भूमिका? इस्टाग्राम स्टोरीने उत्सुकता वाढवली…
दरम्यान, कोथरूड परिसरात जो मोहोळ यांचा विधानसभा कार्यक्षेत्र मानला जातो निलेश घायवळ टोळीने अलीकडेच गोळीबार केला होता. या घटनेनंतर घायवळ टोळीचे राजकीय संबंध समोर आले असून, शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घायवळला पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप केला होता. घायवळने बोगस पासपोर्ट तयार करून, नावांमध्ये फेरफार करत, दोन ठिकाणी मतदान ओळखपत्र तयार केले आणि करोडोंची संपत्ती जमवून परदेशात फरारी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात या साखळी गुन्ह्यांनी नागरिक अस्वस्थ असताना, शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ मात्र गुन्हेगारीवरील प्रश्नांना चुकवून निघून गेल्यामुळे, “शहरातील वाढती गुन्हेगारी आणि लोकप्रतिनिधींचं मौन” हा मुद्दा अधिकच तीव्र बनला आहे.