Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाला. यामध्ये एका मालवाहू ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज उर्से टोलनाक्याजवळ आढे या गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. ही कार मुंबईहून पुण्याला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये कारचा पुढचा अर्धा भाग ट्रकच्या खाली गेला होता. त्यामुळे […]

Road Accident

Road Accident

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाला. यामध्ये एका मालवाहू ट्रकला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज उर्से टोलनाक्याजवळ आढे या गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. ही कार मुंबईहून पुण्याला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये कारचा पुढचा अर्धा भाग ट्रकच्या खाली गेला होता. त्यामुळे कारमधील प्रवासी अक्षरशः चिरडले गेले आहेत.

त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी यंत्रणांच्या मदतीने ही अपगात झालेली वाहनं बाजूला करून वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरीव वाहतूक सुरळीत झाली.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा राज्यातील पुणे-मुंबई सारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग आहे. यावर नेहमीत अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सामान्य नागरिकच नाही तर या अगोदर राज्यात अनेक आमदार राजकीय नेत्यांना देखील अशा रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे योग्य सुविधा उपलब्ध कधी होणार आणि हे अपघातांचं सत्र कधी थांबणार असा प्रश्न सामान्या नागरिक विचारत आहेत.

Exit mobile version