Expressway Jam : 32 तास अन् बघ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत ‘वार’

Raj Thackeray परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.

Expressway Jam : 32 तास अन् स्वस्थपणे बघणाऱ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत 'वार'

Expressway Jam : 32 तास अन् स्वस्थपणे बघणाऱ्यांचा कोडगेपणा; राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दांत 'वार'

टँकर उलटून झालेल्या अपघातानंतर सुमारे 32 तासांनंतर सुरळीत झाला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ठप्प होता असेही सांगितले जात आहे. या भीषण जामवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी मनसेकडून करण्यात आलेलं टोलचं आंदोलन हे टोल वसुलीसाठी नव्हतं असा उल्लेख केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक्सप्रेसवेवरील जमाबाबत सविस्तर पोस्ट लिहिली त्यात ठाकरेंनी टोल वसुली ते चौकशी या सर्व मुद्द्यांची लख्तरं काढली आहेत.
राज ठकारेंची पोस्ट काय?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार,प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे. मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मनसेचं आंदोलन हे टोलवसुलीचं नव्हतचं तर…
स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय 
परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय असल्याचे राज यांनी म्हटले आहे.

वसूल केलेला टोल परत केला पाहिजे

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

Exit mobile version