Pune News : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी (Pune News) समोर आली आहे.पुण्यातील तब्बल 40 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्यांवर आधी महाविद्यालय परिसरातच उपचार करण्यात आले. तर आता विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
‘या’ महविद्यालयातील धक्कादायक प्रकार
पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील आय.आय. ई. बी. एम. या नामांकित बिझनेस महाविद्यालयातील अनेक विद्यार्थांना चक्कर येऊ लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. आधी महाविद्यालय परिसरातच उपचार दिल्या जात असलेल्या विद्यार्थ्यांना आता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Maharashtra Politics: पक्षांतरबंदी कायद्यात सदस्यांच्या अपात्रतेबाबत काय तरतूद ? पाहा व्हिडिओ
मिळालेल्या माहितनुसार सुमारे 40 विद्यार्थ्यांना हा त्रास होतं होता त्या पैकी 12 विद्यार्थ्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं या संपूर्ण प्रकाराबाबत आधी महाविद्यालय प्रशासन बोलण्यास टाळाटाळ करत होते. मात्र अखेर त्यांनी हा प्रकार घडल्याचे मान्य केलं. महाविद्यालया तर्फे राजमाची किल्ल्यावर ट्रेक नेण्यात आला होता. तिथून परत येत असताना हा प्रकार घडल्याचे कॉलेज व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
Pune : अनैतिक संबंध उघड करण्याची तरुणाला धमकी : महिलेकडून 20 लाखांच्या खंडणीची मागणी
उपचार घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील व्यवस्थापनाने दावा केला आहे. मात्र, उपचारासाठी भरती झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे ब्लड प्रेशर लो असल्याने त्यांना तातडीने उपचार द्यावे लागल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्या एव्हढी गंभीर परिस्थिती कशामुळे निर्माण झाली, हे अद्यापही समजू न शकल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान या प्रकरावर डॉ. किरण मुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, यातील एका मुलीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर इतरांची प्रकृती देखील ठिक आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांचा बीपी लो आहे. सर्वांचे लक्षणं सारखीच आहेत. तसेच त्यांना ट्रेकींगमुळे डिहायड्रेशनचा देखील त्रास होत आहे. अशी माहिती त्यांनी दिली.