Download App

Pune : MPSC करणाऱ्या 6 रुममेट्समध्ये राडा, चिकन बनवणाऱ्या मैत्रिणीला हात-पाय धरून झोडपलं

ही घटना सदाशिव पेठेतील एका वन रूम किचनमध्ये शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे. MPSC Women Student Beaten For Not Clining Wash Besin

  • Written By: Last Updated:

MPSC Women Student Beaten For Not Clining Wash Besin After Making Chikan :  पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, राज्यभरातील कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. अशाच स्पर्धा परीक्षेची (MPSC Student) तयारी करणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये चिकन (Chikan) बनवल्यानंतर बेसिन स्वच्छ न करण्यावरून तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  ही घटना सदाशिव पेठेतील एका वन रूम किचनमध्ये रविवारी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पाच विद्यार्थींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 23 वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे.

आरबीआयने बदलला भाडं भरण्याचा नियम, भाडेकरूंना धक्का; ‘ही’ सेवा झाली बंद

सदाशिव पेठेतील वन रूम किचनमध्ये नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, हाणामारी झालेल्या विद्यार्थीनी (Student) या स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या वन रूम किचनमध्ये भाड्याने वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी फिर्यादी तरूणीने चिकन बनवले होते. पण, बेसिन स्वच्छ केले नाही. याच शुल्लक कारणावरून फिर्यादी तरूणी आणि तिच्या अन्य रूममेट्सने “तू दुपारी चिकन बनवलं होतंस, त्यानंतर बेसिन धुतलं नाहीस,” असे म्हणत स्नेहन नावाच्या तरूणीने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाद घालण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

भितींवर ढकललं अन्…

पुढे हा वाद वाढत गेला. स्नेहलने बेसिन धुतलं नाही यावर मारहाण झालेल्या तरूणीने “मी बेसिन साफ केलं आहे, एवढं मोठ्याने ओरडू नकोस” असे प्रत्त्युत्तर दिले. त्यानंतर चवताळलेल्या स्नेहलने रागाच्या भरात फिर्यादी तरूणीला भिंतीवर ढकललं आणि दाबून धरलं. त्यावेळी रूममध्ये उपस्थित अन्य चार तरूणींनी चिकन बनवून बेसिन स्वच्छ न करणाऱ्या तरूणीच्या तोंडावर चापट्या मारत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

वस्तुंप्रमाणे अवघ्या काही मिनिटांत हाडंही चिटकवता येणार! चीनने बनवलं हाडांचं फेविक्विक…

कसाबसा पळ काढला अन् पोलिसांना फोन फिरवला

या संपूर्ण प्रकारात घाबरलेल्या तरूणीने स्वतःची रूममधून कशीबशी सुटका करून घेत बाहेर पळ काढला त्यानंतर तिने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणी 23 वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून पाच विद्यार्थींविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मारहार करणाऱ्या तरूणी फिर्यादीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालत असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. MPSC Women Student Beaten For Not Clining Wash Besin After Making Chikan

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एमपीएससीची परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या सहा तरुणींमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठं भांडण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

follow us