Download App

Pune News : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘या’ कलाकारांचा सहभाग, कार्यक्रमाला रात्री 12 पर्यंतच परवानगी

  • Written By: Last Updated:

Pune News : पुण्यामध्ये (Pune News) 13 ते 17 डिसेंबर दरम्यान 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेचे निर्बंध देखील घालण्यात आले आहेत.

कार्यक्रमाला रात्री 12 पर्यंतच परवानगी असणार…

या महोत्सवाची वेळ पहिल्या दिवशी (13 डिसेंबर) दुपारी तीन वाजता अशी असेल. यानंतर दि 14 व 15 डिसेंबर या दोनही दिवशी महोत्सव दुपारी 4 वाजता सुरु होईल. शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी महोत्सव दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत असेल. शेवटच्या दिवशी (१७ डिसेंबर) महोत्सवाची वेळ दुपारी 12 ते रात्री 10 अशी असणार आहे.

Mla Disqualification : ‘विधानसभा अध्यक्षांनी खुर्चीचं पावित्रं राखावं’; नाना पटोलेंचा नार्वेकरांना सल्ला

तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेचे निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम 12 पर्यंतच सुरू ठेवता येणार आहे. चालू वर्ष हे पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या तीनही दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकार यावर्षी महोत्सवात आपली कला सादर करतील असेही श्रीनिवास जोशी यांनी नमूद केले.

ASK SRK : ‘डिंकी’च्या रिलीजपूर्वीच शाहरुख खानची मोठी घोषणा! हाऊसफूल…

यंदाच्या महोत्सवास कल्याणी समूह, किर्लोस्कर समूह, नांदेड सिटी, पी एन गाडगीळ अँड सन्स, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., डी. वाय. पाटील विद्यापीठ, पृथ्वी एडीफिस, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, गोखले कंस्ट्रक्शन्स, लोकमान्य मल्टीपर्पज- को ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना आणि आशा पब्लिसिटी यांचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंग कम्युनिकेशनची जबाबदारी इंडियन मॅजिक आय या संस्थेकडे असेल.

69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘या’ कलाकारांचा सहभाग

तुकाराम दैठणकर आणि सहकारी, पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक संजय गरुड, पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांचे गायन होईल. तेजेंद्र नारायण मजुमदार पं. उल्हास कशाळकर हे कलाकार पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी अंकिता जोशी, पं. उपेंद्र भट, पार्था बोस, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे हे कलाकार सादरीकरण करणार आहेत.

तर तिसऱ्या दिवशील रजत कुलकर्णी, श्रीमती पद्मा देशपांडे, नीलाद्री कुमार, पं अजय पोहनकर, अभिजित पोहनकर. चौथ्या दिवशी प्राजक्ता मराठे, देबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, यामिनी रेड्डी, अभय सोपोरी, परवीन सुलताना शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी श्रीनिवास जोशी, पौर्णिमा धुमाळे, सुहास व्यास, ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी, कौशिकी चक्रबर्ती, रोणू मजुमदार, प्रभा अत्रे यांच्या गायनाने ६९ व्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता होईल.

Tags

follow us