Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन
Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर एक शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या.
आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत बेमुदत….
ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका…
मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा जन्म 1941 मध्ये झाला त्यानंतर त्यांचं बालपण हे राजस्थानमध्ये गेले. अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी गणित विषयात पदवी घेतलेली. तर अजमेरमध्येच त्यांनी संगीत महाविद्यालयात गोविंदराव राजूकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर वसंतराव राजूरकर यांच्याशीच त्या विवाहबद्ध झाल्या.
PAK vs BAN : बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली, पाकसमोर 194 धावांचे आव्हान
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवामध्ये गायन केले आहे. त्यामध्ये गुणीदास संमेलन मुंबई, तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे), शंकरलाल महोत्सव (दिल्ली) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी टप्पा आणि तराना या गायिकीवर प्रभुत्व निर्माण केलेले होते. त्यांची ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’ या दोन मराठी नाट्यगीते लोकप्रिय ठरली आहेत.