आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत बेमुदत….

  • Written By: Published:
आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत बेमुदत….

अहमदनगर : गेल्या 7-8 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानं मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला असतांना आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही तापला. धनगर आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी यशवंत सेनेने आजपासून (६ सप्टेंबर) चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. (Ahmednagar News)

यासंदर्भात बाळासाहेब दोडतळे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, धनगर समाज गेल्या सत्तर वर्षांपासून संविधानातील अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका प्रत्येक सरकार आणि राजकीय पक्ष घेतात. मात्र, आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही कृती होत नाही. त्यामुळे समाजात तीव्र असंतोष पसरला. आता 18 ते 22 सप्टेंबर या संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन सुरू केलं. या अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती(एसटी प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला.

Maratha Reservation : मनोज जरांगेंनंतर कोपर्डीतही आंदोलकांची तीच भूमिका… 

दोडतले म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत. फडणवीसांनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता इतर लोक सत्तेत आले. तरीही आमची मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, या आंदोलनातही फडणवीस यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार आहे.

या आंदोलनात अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे पाटील, बाळासाहेब दोलतडे, माणिकराव दांगडे (बारामती), अण्णासाहेब रूपनवार (माळशिरस), गोविंद नरवटे (लातूर), सुरेश बंडगर (परभणी), साधन पाटील (जळगाव) आदी सहभागी झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube