Download App

“देवेंद्रचं स्टेटमेंट अतिशय चुकीचं, मी त्याला..” पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे. मी त्याला सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

Ajit Pawar News : अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, तर दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाल्यांना मिळतात अशा आशयाचं विधान केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. विरोध पक्षांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली होती. इतकेच काय तर देवेंद्र भुयार यांनी केलेलं वक्तव्य अजितदादांनाही रुचलं नव्हतं. आज अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या मुद्द्यावर अजितदादांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे. मी त्याला सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह, २४ तास हेल्पलाईन, महिला सुरक्षेसाठी पंचशक्ती; अजितदादांची माहिती

काय म्हणाले होते देवेंद्र भुयार?

पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर ती तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही. नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्यांचा पान ठेला आहे, धंदा, किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटतो, शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिलं नाही असं भुयार म्हणाले होते.

काय म्हणाले अजित पवार ?

या वक्तव्यावर विरोधकांनी अजितदादांनीही घेरलं होतं. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनाही त्यांना देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर अजित पवार म्हणाले, एक मिनिट.. देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य गेलं ते अत्यंत चुकीचं होतं. मुलींना वेदना देणारं होतं. शेतकऱ्यांबद्दल अपमान वाटणारं होतं, असं काल मला कळल्या कळल्या सांगितलं. कारण पाच वर्षे तो माझा सहकारी म्हणून काम करत होता. त्यानं मला सांगितलं की माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता.

Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ

follow us