Pune News : शहरातील ससून रुग्णालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे कँटोन्मेंट (Pune News) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता आमदार कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुतीवर सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
पुणे : नवीन वर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणीचा राडा; बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचा दावा
पुण्यातील ससून रुग्णालयातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. आमदार सुनील कांबळेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. नेमक्या याचवेळी ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विरोधकांनीही जोरदार टीका केली. ड्युटीवर असेलल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
या घटनेनंतर सरकारही बॅकफूटवर गेले होते. अखेर काल रात्री आमदार कांबळे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर कांबळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत स्पष्टीकरणही दिले होते. मी कुणालाही मारहाण केलेली नाही. समोरच्या व्यक्ती कोण आहे हे आपल्या माहिती नाही असे म्हणत मी का मारहाण करेल का? असा उलट प्रश्न कांबळेंनी उपस्थित केला होता. समोरच्या व्यक्तीशी माझे कोणतेही वाद नाही त्यामुळे त्याला मारहारण करण्याचा काही संबंध नसल्याचेही कांबळे यांनी घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले होते.
Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले