Pune News : पुण्यातील आयटी हब हिंजवडीत रविवारी एका प्रियकराने (Pune News) आयटी इंजिनिअर प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली. मयत प्रेयसी आणि तिची हत्या करणारा आरोपी ऋषभ निगम हे दोघे मागील दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आरोपी प्रियकर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हाच संशय डोक्यात घेऊन तो पुण्यात आला होता. दोघेही उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी होते.
या घटनेतील मयत महिला इंजिनिअर इंदिरानगर सेक्टर 11 मध्ये राहत होती. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून 2013 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. महिला पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरीला होती. तिचा प्रियकर उत्तर प्रदेशात राहत होता. काही काळानंतर महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केल्याचा राग त्याला आला.
धक्कादायक! आयटी हब हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; परिसरात खळबळ
पिंपरी चिंचवडमधील एका लॉजवर 27 जानेवारी रोजी ही घटना घडली. या हत्येनंतर ऋषभ निगम तेथून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी लागलीच हालचाली करत नाकाबंदी केली आणि त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषभ निगम हा उत्तर प्रदेशातून पुण्यात आला होता. येथील एका लॉजमध्ये तो राहत होता. दुसऱ्या दिवशी तो तरुणीला भेटायला गेला. शनिवारी रात्री मात्र गोळ्या झाडून तो पसार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये तो परिसर सोडून पळून जाताना दिसला.
यानंतर पोलिसांनी ऋषभकडे चौकशी केली. हत्येचे कारण काय याची माहिती घेतली. त्यानंतर तो म्हणाला, मागील दहा वर्षांपासून मी तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होतो. मात्र काही दिवसांपासून ती दुर्लक्ष करत होती. यावरून बरेच वादही झाले होते. याच कारणासाठी मी पुण्याला तिला भेटायला आलो होतो. येथेही लॉजवर झालेल्या वादानंतर गोळ्या झाडण्यात आल्या.
Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ 25 जानेवारी रोजी लॉजमध्ये थांबला होता. दुसऱ्या तो तरुणीला भेटला. त्यानंतर रात्री दोघेही एकत्र लॉजवर गेले. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत. आरोपी ये जा करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अटकेवेळी त्याच्याकडून एक पिस्तुलही जप्त करण्यात आले.