पुणे : पुणे शहरात पंचवीस वर्षीय दोन तरुणांबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन मित्रांना एका इमारतीमध्ये नेऊन मारहाण देऊन करंट देण्यात आला. त्यानंतर एकमेंकाना अश्लिल कृत्य करायला लावून, त्याचे व्हिडिओही काढण्यात आलेत. या प्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी घडला असून, एका 25 वर्षीय ड्रायव्हरने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तो एका कंपनीचे कर्मचारी ने-आणण्याचे काम करतो. 13 ऑक्टोबर रोजी तो एका मित्राच्या रुमवर गेला होता. त्यावेळी रुमवर मित्र नव्हता. मित्राचा मित्र रुमवर होता. मित्राचे दोन ओळखीचे मित्र व इतर अनोळखी दोघे रुमवर आले. रुमवर नसलेल्या मित्राबाबत विचारणा केल्यानंतर मला व माझ्या मित्राला मोटारसायकलवरून खराडी येथील एका इमारतीमधील प्लॅटमध्ये नेले. तेथे दोघांना चौघा जणांनी मारहाण सुरू केली. कपडे सुखविण्याचे स्टॅण्डने डोक्यात, पाठीत मारहाण केली. त्यानंतर एकाने दोघांच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. कपडे काढण्यास नकार दिल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने वायरने करंट दिला. त्यामुळे दोघांनी घाबरून कपडे काढले, त्यामुळे आम्ही घाबरून आमचे पूर्ण कपडे काढले. त्यानंतर दोघांना अश्लील व अपमानास्पद कृत्य करण्यास भाग पाडले व दोघांचे मोबाईलमध्ये नग्न फोटो, व्हिडिओ काढले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
जबरदस्तीने दारू पाजून लातूरला नेले
पोलिसांकडे किंवा इतर कोणाला या बाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच तसेच जीवे मारण्याची धकमी दिली. त्यानंतर कपडे घालण्यास सांगून तीन मोटारसायकलवरून खराडी गाव येथील स्मशानभूमी येथे नेऊन दोघांना जबरदस्तीने दारू पाजली. त्यातील मारहाण केलेल्या ड्रायव्हरच्या कारचे जीपीएस एकाने तोडले. त्यानंतर चौघांना लातूर येथील एका गावात जलपरी हॉटेल जवळील शेतात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी लातूर येथे पोहोचल्यानंतर आणखी एक जण आला. त्याला सोबत घेऊन पुन्हा मारहाण केलेल्या दोघांना कारमध्ये बसवून खराडी येथील एका रुमवर आणून डांबून ठेवले होते.
दुसऱ्या दिवशी प्लॅटवर आणून मारहाण
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मारहाण केलेल्या तरुणाला कारची चावी दिली. त्यानंतर पुन्हा खराडी येथील प्लॅटवर दोघांना घेऊन गेले. तिथे माझ्या एका मित्राला फोन लावण्यास सांगून. तू कोठे आहेस, मला घ्यायला ये, असे जबरदस्तीने बोलायला लावले. त्यानंतर दुसऱ्या रुममध्ये नेऊन आठ दिवस डांबून ठेवून मारहाण केली. त्यानंतर चेहऱ्यावरील व अंगावरील मारहाणीच्या जखमा बऱ्या झाल्यानंतर एका आरोपीने दोन्ही मित्रांना पुन्हा ओला कारमधून मुंबईला घेऊन गेले. त्यावेळी एका आरोपीचा आणखी एक साथीदार गाडीत बसून आला. एका मॉलमधील एका आयफोन स्टोअरमध्ये मी व मित्र गेले. त्यावेळी आरोपी हे स्टोअरबाहेर थांबले होते. त्यानंतर आरोपी मारहाण झालेल्या एकाचा मोबाइल घेऊन निघून गेले. त्यानंतर स्टोअर मॅनेजरसमोर मारहाण झालेल्यांनी आपबिती सांगितली. त्यानंतर वडिलांकडे पैसै मागवून पुन्हा पुण्याला आलो. 25 ऑक्टोबरला वडिलांच्या कामाचा ठिकाणी गेलो. त्यानंतर तीन दिवसांनी माझ्या वडिलांना एका कॅब चालकाने माझा मोबाईल आणून दिला आहे. नग्न फोटोवरील व्हायरल करण्याच्या भितीमुळे तक्रार दिली नव्हते. त्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली आहे.
