Download App

पत्नी राजकारणात अन् पती कुख्यात गुन्हेगार; शरद मोहोळ गॅंगचा विषय काय?

Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच नावाची चर्चा होत आहे. अशातच आता शरद मोहोळ गॅंगचा पुण्यात नेमका काय विषय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

Ajit Pawar : नाट्य संमेलनाचं निमंत्रण नाही म्हणत अजितदादांनी पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?

पुण्यात गुन्हेगारी क्षेत्रात दोन गॅंगचंच वलय असल्याचं ऐकायला मिळत. त्यातील एक म्हणजे मारणे गॅंग आणि दुसरी म्हणजे मोहोळ गॅंगस्टर शरद मोहोळ याच गॅंगचा म्होरक्या आहे. शरद मोहोळने आत्तापर्यंत अनेक हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीसह अपहरणाचे गुन्हे केले असल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यात आहेत. शरद मोहोळ याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांमधून सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

पवार आणि मुंडे यांच्यात संवाद : ढाकणे कोणता निरोप घेऊन आले होते?

बाहेर आल्यानंतर शरद मोहोळने सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केलं होतं. या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये शरद मोहोळला अटक करण्यात आली. याचदरम्यान त्याने येरवड्यात कातिल सिद्धीकीचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळालायं.

‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’साठी ‘इतका’ टोल लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजप प्रवेश :
काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने राजकारणात उतरवण्याचं ठरवलं. कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांनी भाजपात प्रवेश केला. मोहोळ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर मोहोळ गॅंगला राजकारणातून सपोर्ट मिळतोयं, असंही दबक्या आवाजात बोललं जात होतं. तर स्वाती मोहोळ यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून मदत मिळणार असल्याचीही शक्यता राजकीय वर्तवण्यात आली होती.

कोथरुडमधून सध्या पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा भाजपमध्ये दबदबा आहे. अशातच मोहोळ यांनी राजकारणात एन्ट्री केल्याने भाजपकडून पुढील काळात महापालिका निवडणुकींमध्ये शरद मोहोळ यांचाच दबदबा वाढणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, पुण्यातील राधा चौकात मोहोळवर गोळीबार करण्यात आल्याने सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शरद मोहोळची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला आहे. तर हा गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us