‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’साठी ‘इतका’ टोल लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’साठी ‘इतका’ टोल लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Mumbai Trans Harbour Link : भारतातला सर्वांत लांब असणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचं (Mumbai Trans Harbour Link) नामकरण अटल सेतू (Atal Setu) असं करण्यात आलं असून आता या सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आले आहेत. या सेतूचं बांधकाम एमएमआरडीएकडून करण्यात आलं असून या सेतूसाठी वाहनांना 500 रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सागरी सेतूवर कारसाठी 250 रुपये टोल आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बहुप्रतिक्षित शिवडी न्हावा शेवा सागरी पूलावरुन नागरिकांना 250 रुपये टोल भरुन प्रवास करता येणार आहे.

या सेतूचं बांधकाम आता पूर्णत्वास आलं असून 25 डिसेंबरलाच लोकार्पण करण्यात येणार होतं मात्र, हे लोकार्पण झालं नाही. त्यानंतर आता येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेतूचं लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात प्रवाशांना या पूलावरुन प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे.

Nupur Shikhare: ना घोडा ना फेटा, जीमवेअरमध्ये लग्नाची वरात घेऊन आला आमिरचा जावई

भारतातील सर्वात मोठा हा सागरी सेतू असून या सेतूवरुन प्रवाशांना नवी मुंबई ते मुंबईपर्यंतच अंतर 30 मिनिटांतच कापता येणार आहे. तर मुंबई, नवी मुंबई, विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग या सेतूमुळे जोडला जाणार आहे. तर मुंबईकरांचा पुण्यापर्यंतचा प्रवास या सेतूमुळे आणखीनच सोप्पा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

12 जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे. ते नाशिकच्या राष्ट्रीय युवा संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीयं. याचवेळी ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सेतूसाठी जवळपास21 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून या सेतूची लांबी 22 किलोमीटर आहे.

दरम्यान, शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवरुन एकेरी प्रवास करण्यासाठी हलक्या वाहनांना 500 रुपये तर अवजड वाहनांना 800 रुपये टोल आकारण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर आज मंत्रिमंडळामध्ये कारसाठी 250 रुपये टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube