PM मोदी मुंबईत दाखल होण्यापूर्वी नाराजी नाट्याला सुरूवात; ठाकरेंकडून बहिष्कार
PM : पंतप्रधान मोदी आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते मुंबई येथे अटल सेतूच्या उद्घाटनासह राज्य सरकारच्या 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचे उद्घाटन तसेच काही प्रकल्पनाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र मोदी मुंबईत दाखल होण्यापूर्वी नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे.
PM Modi : युवकांना इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी; जोशपूर्ण उदाहरणं देत मोदींनी तरूणांना दिला ‘बूस्टर’
याचे कारण म्हणजे पंतप्रधान यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्यात आलेले नाही. शासकीय प्रोटोकॉलनुसार न्हावाशेवा हा ब्रिज खासदार अरविंद सावंत यांच्या मतदार संघातून जातो. तसेच अजय चौधरी हे स्थानिक आमदार आहेत. त्याचप्रमाणे वरळी सागरी मार्गाचा भाग देखील आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात येतो.
Nawazuddin Siddiqui: सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेता थोडक्यात बचावला
असे असताना देखील या लोकप्रतिनिधींची नावं निमंत्रण पत्रिकेत नाही. याउलट शिंदेंच्या शिवसेनेच्या मावळ आणि अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीच्या रायगडच्या खासदारांची नावे या निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतूच्या उद्घाटनावर ठाकरेंकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे.
दरम्यान आज (12 जानेवारी) सकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडून या संबंधित ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाला या असा निरोप मिळाला आहे. पण अशा प्रकारे आमंत्रण देणे. हा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला जाणार नाही. अस उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं. त्यामुळे मोदी मुंबईत दाखल होण्यापूर्वी नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे.
देशातला सर्वात मोठा सागरी पूल भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ट्रांस हार्बर लिंक म्हणजेच शिवडी-नाव्हा-शेवा समुद्री पूल त्यार होऊन पूर्ण झाला. चीननंतर हा जगातला सर्वात लांब समुद्री मार्ग असेल. या मार्गाचा इतिहास खूप रंजक आहे. ट्रान्स हार्बर मार्गाची संकल्पना तशी सर्वप्रथम 1963 मांडली गेली. त्याविषयी सर्व्हे झाला. पण वर्दळ आणि उपयोगी नसल्याने हा प्रकल्प बासनात पडला. 1970 च्या काळात नवी मुंबईची रचना करताना हा पूल परत चर्चेत आला. पण त्यावेळी वाशी खाडी पूल अधिक व्यवहार्य ठरला. ट्रान्स हार्बर लिंक पुन्हा मागे पडला.
या पुलाविषयी खरी चर्चा 2004 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुरू झाली. डिझाईन मार्गाची आखणी ठरल्या. पुढे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या वादा या प्रकल्पावर फारसं काम झालं नाही. पुलाचे खरे पेपरवर्क तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात सुरू झाले. या भागातील मंग्रो आणि फ्लेमिंगो पक्षामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयकडून अडचण आली. तर 2012 मध्ये पर्यावरण आणि सीआरझेड या सर्व परवानगी मिळाली. केंद्रीय अर्थ मंत्रालयची परवानगी मिळाली. 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा विडाच उचलला . या पुलाला सर्व मंजुरी मिळाल्याची घोषणा केली . हा प्रकल्प पीपीपी मॉडल वर न करता शासनाच्या खर्चातून करण्यकाचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली.