Hindavi Patil : दुसऱ्या दुकानांवर कारवाई नाही, माझ्याच का? डोळ्यातले अश्रू पुसून ‘हिंदवी’चा सवाल

दुसऱ्या दुकानांवर कारवाई नाही, माझ्याच का? असा थेट सवाल नृत्यांगणा हिंदवी पाटीलने डोळ्यातले अश्रू पुसून महापालिकेच्या आयुक्तांना केलायं.

Hindavi Patil

Hindavi Patil

Hindavi Patil : प्रसिद्ध नृत्यांगणा हिंदवी पाटील (Hindavi Patil) यांच्या पुण्यातील सह्याद्री अमृततुल्य नावाच्या चहाच्या दुकानावर पुणे महापालिकेने कारवाई केलीयं. या कारवाईनंतर हिंदवी पाटीलचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता अश्रू पुसल्यानंतर हिंदवी पाटीलने दुसऱ्या दुकानांवर कारवाई नाही, माझ्याच दुकानावर का? असा थेट सवाल महापालिका आयुक्तांना केलायं. पालिकेच्या आयुक्तांच्या भेटीनंतर हिंदवी पाटीलने माध्यमांशी संवाद साधलायं.

मोठी बातमी! G7 परिषद सोडून ट्रम्प अमेरिकेत परतणार, तेहरान रिकामे करण्याचे आदेश

पुढे बोलताना हिंदवी पाटील म्हणाली, माझ्या दुकानावर महापालिकेने कारवाई केलीयं, या कारवाईबद्दल मला कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. कारवाई कोणत्या कारणामुळे केली आहे हेही मला माहिती. अनधिकृत बांधकाम इतर दुकानांचं आहे, पण त्या दुकानांवर कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती आम्ही आयुक्तांना विचारली, त्यावर आयुक्तांनी कारवाईची चौकशी करुन माहिती देणार असल्याचं सांगितलं असल्याचं हिंदवीने स्पष्ट केलंय.

आमदार – खासदारांशी चर्चा अन् मुंबईत सात कोटी मराठा; आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा मास्टर प्लॅन

सह्याद्री बोर्डावर महाराजांची तलवार अन् जिरेटोपही…
महापालिकेने हिंदवी पाटीलच्या चहाच्या दुकानाचं अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत कारवाई केल्याचं बोललं जात आहे. सह्याद्री अमृततुल्य बोर्डावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, तलवार होती. यामध्ये काही चुकीचं असतं तर आम्ही बदल केला असता, पण मराठी उद्योजक पुढे येत असेल तर त्यांचे पायं तुम्ही खेचत असल्याची टीकाही हिंदवी पाटीलने केलीयं.

दरम्यान, पुण्यातील विमाननगर भागात हिंदवी पाटीलचा चहाचा स्टॉल असून तिच्या या दुकानाची पाटी महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तोडली. पालिकेच्या कारवाईनंतर हिंदवीला अश्रू अनावर झाले. पालिकेच्या कारवाईमुळे हिंदवी पाटील ढसाढसा रडली.

Exit mobile version