Download App

धक्कादायक! आयटी हब हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; परिसरात खळबळ

Pune News : पुण्यातून गुन्हेगारीची आणखी एक खळबळजनक (Pune News) घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील हिंजवडी येथील आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह एका लॉजमध्ये आढळला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. प्रेम संबंधातून महिलेची हत्या या व्यक्तीने केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली. आरोपी आणि हत्या झालेली महिला दोघेही लखनौचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील एका लॉजमध्ये तरुणीची हत्या झाली. ही माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही महिला मागील दोन दिवसांपासून लखनौवरून आलेल्या तिच्या मित्रासोबत लॉजमध्ये राहत होती.

Pune गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बाणेरमध्ये बड्या हॉटेलांमधून 11 महिलांची सुटका

आज सकाळी मात्र या मित्राने तिची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत नाकाबंदी केली आणि त्याला ताब्यात घेतले. या हत्येसाठी त्याने वापरलेली बंदूकही पोलिसांनी जप्त केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. मात्र,अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. प्रियकराला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढीलचा तपशील स्पष्ट होणार आहे. दोघे ही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करायचे.

दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरून वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा आता पोलीस तपासात होणार आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या व्यक्तीने आयटी इंजिनिअर महिलेची हत्या का केली याची माहिती समोर येणार आहे.

Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला

follow us

वेब स्टोरीज