Ketan Agrawal Murder Case : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये (Ketan Agrawal Murder Case) अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. केतनच्या हत्येचा कटाची सुरुवात बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन झाली असल्याचा दावा चार्जशीटमधून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागले आहे.
मोठी बातमी, आयकर विभागाच्या रडारवर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग; 12 ठिकाणी छापे
सियाने केतनला लोहगडावर घेऊन जाण्यासाठी एका बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटची मदत घेतली होती. बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने केतनचा विश्वास जिंकला होता. चुलत भावाकडून जुनं अकाऊंट बनावट केल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. लोहगडावर नेण्यासाठी सियाने तिच्या एका मैत्रिणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट केले होते. या अकाऊंटवर तिने मैत्रिणीच्या परवानगीशिवाय तिचा फोटो वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. याच अकाऊंटवरुन ती केतनशी चॅट करत असल्याचा दावा चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. तसेच केतनच्या हत्येच्या प्लॅनिंगसाठी रितेश हांगेकडून सल्ला घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
AI मुळे अब्जावधी लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो ? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून रितेश हिंगे असं त्याचं नाव आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून दोघेही सध्या तुरुंगात आहेत. रितेश हा सिया आणि चेतन यांचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती.
‘भाजपला फायदा होईल असे निर्णय घेता, 4 तारखेला दाखवून देऊ’; संजय राऊत ज्ञानेश कुमारांवर भडकले
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली होती. आता तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी रितेश हिंगेलाही अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या कथित कटाबाबत रितेशला आधीपासून माहिती होती, असा संशय आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यात झालेल्या व्हाट्सॲप संभाषणाच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
