Download App

Pune News : आयडिया केली अन् थेट तुरुंगात घेऊन गेली! फिल्मी स्टाईल लॅपटॉप चोरणाऱ्याला बेड्या

Pune News : पुण्यातील कर्वेनगर परिसरातील इमारतींमधील घरांत शिरुन लॅपटॉप चोरी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलं आहे. या युवकाकडून एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…

कर्वेनगर परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालांची शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, इमारतींमधील फ्लॅटच्या दरवाजांवर अथवा बुटांमध्ये ठेवलेल्या चावी घेत हा युवक घरात प्रवेश करायचा. घरात प्रवेश केल्यानंतर घरातून लॅपटॉपसारख्या किमती वस्तूंची चोरी करत असत.

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतील कॉलेज परिसरतील बिल्डींग, हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विद्याथ्र्यांनी बुट अथवा दरवाजाजवळ ठेवलेली चावी वापरुन विद्याथ्यांचे रुममध्ये चार्जिंगला लावलेले किंवा रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याचे गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.

Video : ‘आम्हाला काम नाही, माती खायची का?’ भर रस्त्यात महिलेने बावनकुळेंना फटकारले

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर आणि गुन्हे शाखेचे अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत छडा लावला. घटनास्थळावरील तसेच आजुबाजूचे परीसरातील प्राप्त फुटेज मधील लॅपटॉप चोरी करण्याया संशयित इसमाचा शोध घेत असताना पोलिसांनी मुंढे यांनी तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून सापळा लावून फुटेजमधील व्यक्ती अर्जुन तुकाराम झाडे, वय २२ वर्षे यास ताब्यात घेतलं.

अर्जुन झाडे याकडे विचारपूस केली असता सुरुवातील त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने कबुली देत गुन्ह्यातील चोरीस गेले लॅपटॉप त्याचेकडे मिळून आल्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अधिक तपासकामी अटक करुन त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील वारजे कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड या परीसरातून लॅपटॉप चोरी केले असल्याचं त्याने सांगितलं. तो यापूर्वी महाड रायगड येथे शिक्षणासाठी असताना त्याने महाड व मानगाव येथे दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

Pramod Kamble : नगरच्या शिल्पकारानं बनवलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं आज अनावरण

पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अर्जुन तुकाराम झाडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान, त्याने आपणच लॅपटॉपची चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या युवकाने आत्तापर्यंत एकूण 12 लॅपटॉप दोन दुचाकी, एक कॅमेरा आणि लॅपटॉप चार्जर चोरल्याचे समोर आले आहे. युवकाला ताब्यात घेतल्यानंतर एकूण 6 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Tags

follow us