Download App

Pune : “माझ्या संपूर्ण शरीरावर बॉम्ब”; वृद्ध महिलेच्या दाव्याने पुणे विमानतळावर खळबळ

पुण्यातून (Pune) एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. एका 72 वर्षीय महिलेने पुणे विमानतळ बाँम्बने (Pune Airport) उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईनंतर (Mumbai) आता पुण्यातही असाच प्रकार समोर आल्यानंतर एकच गोंधळ माजला आहे. मात्र, ही धमकी खोटी असून निव्वळ दिशाभूल करण्यासाठी ही चेष्टा केल्याची माहिती समोर येतेयं. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

https://letsupp.com/maharashtra/art-director-nitin-desais-suicide-case-a-case-has-been-registered-against-five-people-75183.html

‘माझ्या चारही बाजूला बॉम्ब आहेत’ असं सांगत पुणे एअरपोर्ट प्रशासनाची धावपळ उडविणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निता प्रकाश कृपलानी वय ७२, असं महिलेचे नाव आहे. ती पुणे ते दिल्ली या विमानाने प्रवास करणार होती. तर, याबाबत दिपाली बबनराव झावरे वय ३३ या महिला शिपायाने तक्रार दिली होती.

Rahul Gandhi Case : गौतम बुद्धांचं वाक्य अधोरेखित करीत प्रियंका गांधी म्हणाल्या, सुर्य, चंद्र अन्..,

गुरुवारी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर फिस्कींग बुथमध्ये अधिकारी व सहकारी हे सरकारी कर्तव्यावर असताना आरोपी महिला निता प्रकाश कृपलानी वय ७२ वर्षे हिने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’, अशी अफवा पसरवून खोटी माहिती दिल्याने एअरपोर्ट प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

प्रशासनाने चौकशी केली असता असं काहीच आढळून न आल्याने महिलेविरोधात कायदेशीर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीच्या प्रकारानंतर प्रशानाची एकच धावपळ उडाली होती.

Tags

follow us