Rahul Gandhi Case : गौतम बुद्धांचं वाक्य अधोरेखित करीत प्रियंका गांधी म्हणाल्या, सुर्य, चंद्र अन्..,
Rahul Gandhi Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभरातल्या काँग्रेस नेत्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. अशातच काँग्रेसच्या मुख्य सचिव प्रियंका गांधी यांनी भगवान गौतम बुद्धांचा संदेश सांगत आनंदोत्सव साजरा करीत ट्विट केलं आहे. ‘तीन गोष्टी खूप काळासाठी कधीही लपवता येत नाहीत, सुर्य, चंद्र आणि सत्य’ असं गौतम बुद्धांचं वाक्य लिहित ट्विट केलं आहे.
"Three things cannot be long hidden: the sun, the moon, and the truth”
~Gautama Buddha
माननीय उच्चतम न्यायालय को न्यायपूर्ण फैसला देने के लिए धन्यवाद।
सत्यमेव जयते।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2023
काँग्रेसे नेते राहुल गांधी यांना मोदी अडनावाप्रकरणी गुरजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं लोकसभेच्या सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. या प्रकरणी राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून आनंदाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…
आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणं हा निर्णय लोकशाहीला मारक होता. पण शेवटी सत्याचा विजय झाला. आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच देशात लोकशाही जिवंत असल्याचं आज दिसून आलं असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल यांची खासदारकी बहाल होणार आहे. यासोबतच राहुल पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढवू शकणार असल्याचेही न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.