Pune News : देशातील अनेक भागांत कोरोनासह झिका विषाणूचा प्रसार वाढत चालला असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह इतर भागांत झिका (Zika Virus) विषाणूचा प्रसार वाढत आहे. पुण्यात झिका विषाणूचे 66 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुर्यकांत देवकर यांनी दिलीयं. एकूण 66 रुग्णांपैकी 26 रुग्ण गर्भवती महिला आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.
Koyna Dam: कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला
पुण्यातील एरंवडणे परिसरात झिका विषाणूचे 4 रुग्ण आढळून आले होते. या चार रुग्णांमध्ये 2 महिला गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुंढवा परिसरात झिका विषाणूचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं. एरंवडणेनंतर डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव, कर्वेनगरसह खराडीमध्येही झिकाबाधित रुग्ण आढळून आले होते. झिकाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विविध भागांतील नागरिकांची तपासणी करण्याची मोहिम सुरु झालीयं. झिकानंतर शहरात चिकनगुनिया, टायफॉईड, डेंग्यू आजारांचाही प्रसार वाढत आहे.
Ground Zero : शरद पवारांचा डोळा फडणवीसांच्या मोहऱ्यावर… मुश्रीफांविरोधात समरजीत घाटगेंचे नाव?
शहरात स्वच्छ पाण्यामध्ये आढळून येणाऱ्या डासांमुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्यावतीने शहरातील शाळा, महाविद्यालये, घरोघरी जात कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. तसेच झिकाबाधित गरोदर महिलांकडे विशेष लक्ष देण्यात येत असून झिकाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करुन घेण्याचं आवाहन आरोग्य अधिकारी सुर्यकांत देवकर यांनी केलंय.
दरम्यान, दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंग्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यु वाढत असल्याचं समोर आलं आहे. अंगाला सूज येणे, प्लेटलेट्स कमी होणे, तीव्र डोकेदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय.