नगरकरांनो सावधान! जिल्ह्यात झिकाचा शिरकाव, संगमनेरमध्ये आढळले दोन रुग्ण

नगरकरांनो सावधान! जिल्ह्यात झिकाचा शिरकाव, संगमनेरमध्ये आढळले दोन रुग्ण

Zika Virus in Ahmednagar : राज्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असताना झिकाच्या (Zika Virus) रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. पुण्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही झिका आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने (Department of Health) केले आहे.

मोठी बातमी : उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा आणखी एक अपघात; मालगाडी पटरीवरून घसरली 

झिका या नव्या आजाराचे रुग्ण पुण्याबरोबर आता सर्वत्र सापडू लागलेत. या अगोदर मे महिन्यामध्ये नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीला झिकाची लागण झाली होती. तो व्यक्ती आता आजारातून बरा झाला आहे. त्यानंतर आता संगमनेर तालुक्यातील दोन गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे. या गर्भवती महिलांची तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्रत्येक आमंत्रित खासदार-आमदाराला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं… 

नगर जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नाशिकच्या पथकाने संगमनेरला धाव घेत सर्व गर्भवती महिलांची तपासणी करून घ्यावी, असे निर्देश देण्यता आले होते. ज्या दोन महिलांना झिकाची लागण झाली होती. तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं. तसेच तपासणीत पोटातील गर्भही चांगल्या स्थितीत असल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

दरम्यान, झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली. घरात डास होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात साठवलेले पाणी जास्त वेळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दारांना जाळी लावा. आपल्या परिसरातही स्वच्छता राखण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलं.

लक्षणे काय?
बहुतेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी, झिका आजाराची लक्षणे साधारणपणे डेंग्यू आजारासारखीच असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे, डोळ्यांची जळजळ, सांधे आणि स्नायू दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत राहतात.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य पद्धतीने तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आवाहन डॉक्टर नागरगोजे यांनी केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube