प्रत्येक आमंत्रित खासदार-आमदाराला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं…
Supriya Sule : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून आज राजकारण चांगलचं तापलं. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारलया सुरूवात करताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जीआआर काढत तुम्हाला येथे बोलण्याचा अधिकार नाही असा खुलासा केला. यावर आता सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) थेट जीआर दाखवत अजितदादांना प्रत्युत्तर दिलं.
जमशेदजी टाटांना यशवंतराव चव्हाणांची विनंती; शरद पवारांनी सांगितला पिंपरी चिंवडच्या उद्योगाचा किस्सा
माझ्याकडेही जीआर आहे. त्यात प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला.
पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात शरद पवार, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते. या मेळाव्यात बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, आज डीपीडीसीची बैठक झाली. आज मी वडिलांकडून आणखी एक गोष्ट शिकले. जेव्हा पालकमंत्री (अजित पवार) आले तेव्हा पवार साहेबांसह सगळे उभे राहिले. जी व्यक्ती पालकमंत्री होती, त्या पदाचा तो मान होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे हे विचार आहेत, असं सुळे म्हणाल्या.
पुण्यात थरारक घटना, डिजिटल कंटेंट क्रिएटर महिलेला बदम मारहाण, Video व्हायरल…
आमचा आवाज दाबला जातोय…
पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, याच बैठकीत मी आणि अमोल कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि त्यांनी खासदार-आमदारांबाबत मुद्दा मांडला. या बैठकीत फक्त आमंत्रित केलेलं आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी सांगितलं… पण माझ्याकडेही एक जीआर आहे, त्यात प्रत्येक आमंत्रित खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलंय, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आम्हाला मत देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही निधीचा प्रश्न उपस्थित केला. पण या सशक्त लोकशाहीत आमचा आवाज दाबला जात आहे. या हुकुमशाहीविरोधात आपल्यला आवाज उठवायचा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.