पुण्यात थरारक घटना, डिजिटल कंटेंट क्रिएटर महिलेला बदम मारहाण, Video व्हायरल…

. बाणेर-पाषाण लिंक रोडवर (Baner-Pashan Link Road) महिलेला ओव्हरटेक करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Attack On Digital Content Creator Lady

Attack On Digital Content Creator Lady : पुण्या दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आजही पुण्यात एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर (Baner-Pashan Link Road) महिलेला ओव्हरटेक करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित महिला डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. या घटनेनंतर महिलेने व्हिडिओ शूट करून तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

गाव-वस्त्या आणि खेड्यापाड्यांच्या शाश्वत विकासासाठी गोपालन अन् बायोगॅस; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रोत्साहन 

 

जेरलिन डिसिल्वा (Jeralyn DeSilva) असं या महिलेचे नाव आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवरून आपल्या दोन लहान मुलांना सोबत बाईकवरून जात असतांना तिच्यासोबत मारहणा केल्याची घटना घडली. जबर मारहाण केल्याने तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे.

रोहित पवारांनी ‘या’ तीन मतदारसंघावर ठोकला दावा, थेट शरद पवार अन् जयंत पाटलांकडं केली मागणी 

मारहाणीची घटना झल्यानंतर लगेचच जेरलिन यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की, आपल्याला मारहाण करण्यापूर्वी मारहाण करणारा कार चालक आपल्या वाहनाचा जवळपास 2 किलोमीटर पाठलाग करत होता. कार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने आपली कार थांबवली आणि खाली उतरून आपल्या तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्यामुळं नाकातून रक्त येऊ लागले. अज्ञात चालकाने आपल्या दोन मुलांसमोर केसंही ओढल्याचं जेरलिन यांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेनंतर जखमी झालेल्या जेरियन यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण करणारा आरोपी नेमका कोण आहे? त्याचे नाव आणि वय काय? तो कुठला रहिवासी आहे? ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

follow us