Zika Virus : सावध राहा, महाराष्ट्रात वाढत आहे झिका व्हायरस, जाणून घ्या लक्षणे
Zika Virus : पुणेसह राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) 9 रुग्ण आढळून आल्याने केंद्राने बुधवारी सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. माहितीनुसार पुण्यात जुलै महिन्यात झिका व्हायरसचे 7 रुग्ण आढळून आले आहे. तर अहमदनगर (Ahmednagar) आणि कोल्हापूरमध्ये मे 2024 मध्ये एक-एक रुग्ण आढळून आले होते.
केंद्र सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सर्व राज्यांना गर्भवती महिलांच्या झिका व्हायरसच्या चाचणीवर लक्ष देऊन संक्रमित महिलांच्या गर्भाच्या विकासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
झिका व्हायरसचा प्रसार
एडिस या डासाच्या चाव्याव्दारे झिका व्हायरसचा प्रसार होतो. एडिस डास दिवसा चावतो. झिका व्हायरसचा सर्वात गंभीर परिणाम गर्भवती महिलांवर होतो. जर गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाली असेल तर ते गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरू शकते. जर गर्भवतीला झिका विषाणूचा संसर्ग झाला तर बाळाला मायक्राेसेफेली आजार होऊ शकतो. या आजारात बाळाचा डोके आकाराने लहान होतो. तसेच बाळाच्या मेंदूच्या विकासावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते.
या आजारा व्यतिरिक्त इतर जन्मदोष, जसे की डोळ्यांसंबंधी दाेष, श्रवणदोष आणि विकासात्मक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. या दोषांमुळे प्रभावित बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते.
झिका व्हायरस लक्षणे
एडिस या डासाच्या चाव्याव्दारे झिका व्हायरसचा प्रसार होतो. झिका व्हायरसचा संसर्ग अनेकदा सौम्य असतो. त्यामुळे त्याचे फार कमी लक्षणे दिसून येतात. ताप: सौम्य ताप येऊ शकतो.
पुरळ: त्वचेवर लाल पुरळ असू शकतात.
सांधेदुखी: विशेषतः हात आणि पायांच्या लहान सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
स्नायू दुखणे: सामान्य स्नायू वेदना होऊ शकतात.
डोकेदुखी: हलकी ते मध्यम डोकेदुखी होऊ शकते.
डोळ्यांची जळजळ: डोळ्यांमध्ये लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते.
प्रतिबंध:
डासांपासून संरक्षण: डास चावण्यापासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरा.
सैल कपडे: सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घाला जे शरीराचा पूर्णपणे कव्हर करतात.
पाणी साचू देऊ नका: तुमच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, यामुळे डासांची निर्मिती होते.
आरोग्य तपासणी: जर तुम्ही झिका बाधित भागात असाल तर आरोग्य तपासणी करून घ्या.
झिका व्हायरस उपचार
विश्रांती: रुग्णाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.
हायड्रेशन: शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी भरपूर पाणी प्यावे.
वेदना कमी करणारी औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांधे आणि स्नायू दुखण्यासाठी औषधे वापरली जाऊ शकतात.
Punit Balan: श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा जिर्णोद्धार, बालन दांपत्याच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण
वैद्यकीय सल्ला: कोणतेही औषध वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.