Pune News : पुण्यातील विमाननगर (vimannagar) भागातील इम्प्रेस या व्यावसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला भीषण (Fire News) आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या कामगारांनी दीड तास अथक परिश्रम घेत आग विझवलीयं. त्यामुळे धोका टळलायं.
नाईक-निंबाळकर की मोहिते पाटील? माढा अन् माळशिरस तालुका ठरवणार निकाल…
विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलजवळ ही व्यवसायिक इमारत आहे. या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात फर्निचरचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयाला आग लागली तेव्हा इतकी भीषण आग होती आगीच्या झळा वरील मजल्याच्या कार्यालयालाही बसत होत्या.
ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या पथकाला अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र, पथकाने यांत्रिक उंच शिडीचा वापर करुन तीन बंबाच्या मदतीने आग विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, कार्यालयातील फर्निचरचे नूकसान झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी रमेश गांगड यांनी दिलीयं.
दरम्यान, इमारतीमधील कार्यालयाला आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीमधील इतर व्यावसायिक कार्यालय तातडीने निर्मनुष्य करण्यात आले होते. मुख्य चौकातील इमारतीला आग लागल्यामुळे आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.