Download App

कसब्यात ईव्हीएम मशीन झाल्या हॅक ? ; मतमोजणी थांबविण्याची मागणी

Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

वाचा : Kasba-Chinchwad By Election : पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले

याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दरेकर यांनी म्हटले आहे, की 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर स्वप्निल जोशी नामक व्यक्ती उघडपणे बोलत आहे की मी गोव्यावरून आलो होतो, मतदान केले आहे आणि ईव्हीएम मशीन देखील हॅक केली आहे. स्वप्निल जोशी नामक व्यक्तीचे शिक्षण बीकॉम असून तो नोकरी करतो.

Kasba Bypoll Election : भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल

या व्हॉट्सअॅप चॅटिंगचा विचार करता आणि सध्या ईव्हीएम हॅकिंगचे जे आरोप वारंवार केले जात आहेत ते लक्षात घेता कसबा पोटनिवडणुकीत ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत आहे. त्यामुळे स्वप्निल जोशी या व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी, तोपर्यंत मतमोजणी करू नये अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

Tags

follow us