Download App

विहिरीचं बांधकाम सुरू असतानाच मुरूम घसरुन चार मजूर अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Pune News : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील विहिरीचं बांधकाम सुरु असतानाच मुरूम ढासळल्याने चार मजूर कामगार अडकल्याची घटना घडलीयं. दरम्यान, अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

Assembly Session : ‘ये तुझा औरंगजेबाशी काय संबंध?’ आमदार महेश लांडगे अबू आझमीवर सभागृहातच भडकले

बेलवाडी गावात मंगळवारी (ता 1 ऑगस्ट ) रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस, प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वन संरक्षक भरतीचा पेपर फुटला, एकाला अटक, 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल

याबाबत प्राथमिक माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी गावाच्या हद्दीत कवडे वस्तीलगत जमीन गट नंबर 338 मध्ये असलेल्या विहिरीचे रिंग बांधकाम सुरु होते. मात्र, अचानक या विहिरीचा मुरूम कोसळल्याने लावलेली रिंग खाली कोसळली.

दरम्यान, रिंग कोसळल्याने काम करीत असलेले मजूर विहिरीतच अडकले. रात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन रात्रीपासून घटनास्थळी दखल आहेत.

Tags

follow us