Download App

Pune News : महिलेचा अजब प्रताप! 3BHK फ्लॅटमध्ये चक्क 350 मांजरी पाळल्या…

पुण्यातील हडपसर भागात एका महिलेने 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्याचा प्रकार समोर आलायं. त्यामुळे सोसायटीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.

Pune News : पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही, त्याचं कारण असं की पुण्यातील हडपसर भागातील एका 3 BHK फ्लॅटमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 350 मांजरी (Pune News) पाळली असल्याचा प्रकार समोर आलायं. मार्व्हल बाऊंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने हा प्रताप केलायं. तिने आपल्या घरात 350 मांजरी पाळल्या आहेत. ज्या ठिकाणी सोसायटी आहे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्याने नागरिकांना अनेक त्रासाला समोरं जावं लागतंय. हे नेमकं प्रकरण काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात…

Dcm Ajit Pawar : नैतिकतेवरुन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा? अजितदादांनी अंग काढून घेतलं….

रिंकू भारद्वाज व रितू भारद्वाज या महिलांची नावे असून त्या सुरुवातीला सोसायटीमध्ये राहण्यासाठी आल्या, तेव्हा तिचे सर्वच रहिवाशांशी चांगले संबंध होते. सुरुवातीच्या काळात या महिलेला मांजरी पाळण्याची आवड असल्याचं सोसायटीमधील नागरिकांच्या लक्षात आलं. सर्वसामान्य लोकांच्या घरी मांजर पाळली जाते, त्यामुळे सोसायटीमधील लोकांनी दुर्लक्ष केलं. मात्र, या महिलेच्या घरात मदतीनस म्हणून काम करणाऱ्या महिलेकडून तिच्या घरात 50 मांजरी असल्याचंही उघड झालं. तरीही सोसायटीमधील नागरिकांनी आक्षेप नोंदवला नाही. आता मात्र, फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी असल्याचं लक्षात येताच सोसायटीतील नागरिकांनी आक्षेप नोंदवलायं. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महिला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचं नागिरकांचं म्हणणे आहे. या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक

संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मांजरी पाळल्यामुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या, दुर्गंधी, आवाज यामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. पाच वर्षांपासून त्रास असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे रहिवाशांनी 2020 मध्येच तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी त्या महिलेकडे 50 मांजरी असल्याची माहिती मिळाली होती आता मात्र पाच वर्षात हा आकडा 350 वर गेल्याची माहिती मिळत आहे. या सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.

उत्सव शिवजयंतीचा! माँजिजाऊंमुळे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य विदर्भातही विस्तारलेलं; वाचा सविस्तर

दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून 3BHK फ्लॅटमध्ये इतक्या मांजरी पाळल्यामुळे स्वच्छतेच्या अनेक समस्या, दुर्गंधी, आवाज यामुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. पाच वर्षांपासून त्रास असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे. पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे रहिवाशांनी 2020 मध्येच तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी त्या महिलेकडे 50 मांजरी असल्याची माहिती मिळाली होती आता मात्र पाच वर्षात हा आकडा 350 वर गेल्याची माहिती मिळत आहे. या सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावलीयं. आता रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित महिला आपल्या मांजरी ठेवणार की नाही? रहिवासी हैराणच राहणार का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

follow us