Download App

Pune : नियमांचे पालन न केल्यास…स्पर्धा परीक्षा क्लासवर कारवाई होणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची तंबी

Amitesh Kumar Warning Action Against Illegal MPSC Classes : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल आंदोलन (Pune News) केलं होतं. याच पार्श्वभूमीवर कालच पुणे पोलीस आयुक्तालयात (Amitesh Kumar) स्पर्धा परीक्षा वर्ग मार्गदर्शन चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाची परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करता, स्पर्धा परिक्षेचे बेकायदा वर्ग (Illegal MPSC Classes) चालवणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा इशारा देण्यात आलाय.

पोलीस आयुक्त (Pune Police) अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा आंदोलन केलं होतं. आंदोलन करण्यात काही स्पर्धा परीक्षा वर्ग चालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा इशारा दिलाय. स्पर्धा परिक्षेचे बेकायदा वर्ग चालविणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर (MPSC Classes) असणार आहे.

‘मला चिटकून बस, अन्यथा… परीक्षेला बसू देणार नाही’; अहिल्यानगरच्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार

परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमातील बदलांसह विविध मागण्यांसाठी याआधी विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात आली होती. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ते आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पुणे शहरामध्ये स्पर्धा परीक्षा वर्ग, अभ्यासिकांची संख्या वाढली असल्याचं समोर आलंय. यामुळे आता पुणे पोलीस अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. स्पर्धा परिक्षेशी संबंधित वर्ग इमारत, तसेच महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाच्या सुरक्षाविषयक नियमांची पूर्तता, वाहने लावण्याची सुविधा, या बाबी तपासण्यात येणार आहे, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केलंय.

Nashik Crime : नाशिकच्या सातपीर दर्ग्याबाहेर संतप्त जमावाची दगडफेक, 31 पोलीस जखमी, नेमकं काय घडलं?

याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर सुरक्षाविषयक नियमावलीचं पालन न करणाऱ्या स्पर्धा परीक्षा वर्गचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जाड दम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. तर विद्यार्थ्यांना निषेध किंवा बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त करू नका, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी क्लास चालकांना दिली आहे.

 

follow us