‘मला चिटकून बस, अन्यथा… परीक्षेला बसू देणार नाही’; अहिल्यानगरच्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार

Teacher misbehaves with student at Government Polytechnic College Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली (Ahilyanagar Crime) आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडे या नराधमाने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्ग मित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले. त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये (Ahilyanagar News)बोलवले. स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो त्यांना दाखवले. हे फोटो तुमच्या विभाग प्रमुखाला दाखवले, तर परीक्षेला बसण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम दिला.
यातून मार्ग काढायचा असेल, तर माझ्याजवळ बस असं म्हणत, अमित खराडे याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात हातात घेतला. तिला मी तुला परीक्षेला बसू देणार नाही, असं सांगत कॉलेजच्या गोडाऊन मधील अडगळीच्या जागी बोलून (Teacher misbehaves with Girls) घेतले. पुन्हा मला जवळ चिटकून बस असे सांगत फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडला. तिच्या शरीरावर लज्जा उत्पन्न होईल, असे हात फिरवून विद्यार्थिनींला त्रास देण्यास सुरुवात केली.
ICC च्या महत्वाच्या बैठकीला PCB अध्यक्षांची दांडी; नेमकं काय घडलं?
हा प्रकार अमित खराडे याने कॉलेजमधील अजून एक अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत केला होता. ही घटना त्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर त्या तिसऱ्या मैत्रिणींनी थेट 112 नंबरला फोन करून घडलेली घटना (Government Polytechnic College Ahilyanagar) सांगितली. ही घटना समजताच कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाव घेत नराधम अमित खराडे याला ताब्यात घेतले आहे.
ड्रग्जच्या नशेत ‘त्या’ अभिनेत्याने माझा ड्रेस…अभिनेत्री विंसी अलोशियसचा धक्कादायक खुलासा
त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बी एन एस 2023 कलमचे 74, पोस्को कायदा कलम 8,10,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था अन् मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.