पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, 24 तासांत दोषारोपपत्र दाखल

Pune Police : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमावर लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं

Pune Crime News

Pune Crime News

Pune Police’s remarkable performance! Attempted rape on minor girl, chargesheet filed within 24 hours : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या आरोपीवर 24 तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून घटनेचा वेगाने आणि अत्यंत संवेदनशीलतेने तपास करण्यात आला त्यामुळे पोलिसांच्या तत्पर कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

नेमकी घटना काय?

लोणी काळभोर येथे सहा वर्षांची मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून जवळ बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. श्रीधर लिंबाजी कांबळे (वय 46) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर येथे पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कठोर आणि जलद शिक्षा व्हावी या उद्देशाने पोलिसांनी 24 तासांत सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र करण्यात आलं आहे.

मी पालकमंत्री शिरसाटांना कवडीची किंमत देत नाही, पोलिसांना सहकार्य करणार -जलील

नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता पुणे शहरातून आणखी एक संतापजनक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. पर्वती परिसरात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा घरातीलच नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणात ७० वर्षीय वृद्धाने आपल्या स्वतःच्या नातींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही घटना घरातच घडली असून, मुलीचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी बाहेर गेले असताना आरोपीने ही संधी साधल्याचे सांगितलं जात आहे. आई कपड्यांच्या दुकानात काम करते, तर वडील रिक्षा चालवतात.

Exit mobile version