मी पालकमंत्री शिरसाटांना कवडीची किंमत देत नाही, पोलिसांना सहकार्य करणार -जलील

निदा खान ही दहशतवादी असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. तिच्यावर फक्त आरोप आहेत. ती दोषी ठरलेली नाही.

News Photo   2026 05 08T152726.053

नाशिक आयटी कंपनी प्रकरणातील आरोपी (Police) निदा खानला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आलं आहे. या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निदा खान हिला लपवून ठेवण्यासाठी जलील यांनीच मदत केली, असं शिरसाट यांनी म्हटलं असून त्याची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता या आरोपांवर जलील यांनी पलटवार केला आहे.

निदा खान ही दहशतवादी असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. तिच्यावर फक्त आरोप आहेत. ती दोषी ठरलेली नाही. संजय शिरसाट हे काही पोलीस आयुक्त नाहीत, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. निदा खान उच्च न्यायालयात गेली असती तर तिला शंभर टक्के जामीन मिळाला असता. मी छोट्या-मोठ्या नेत्यांनी काय आरोप केले, त्यावर मी उत्तर देणार नाही, असा पलटावरही जलील यांनी केला. एफआयआरमध्ये तर काहीच नाही, असं आमच्या निदर्शनास आलं असंही ते म्हणाले.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांवर गुन्हा दाखल

तू जर काही चूक केली असेल तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही. परंतु तू जे सांगत आहेस ते खरे असेल तर मी तुझ्यासोबत पूर्ण ताकदीने उभा राहीन असं मी तिला सांगितलं होतं. कारण न्यायप्रणाली योग्य निर्णय देईल, असं जलील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडं एआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खान यांना लपवून ठेवल्याचा आरोप आहे. याच आरोपाअंतर्गत पोलिसांनी मतीन पटेल यांना सहआरोपी केलं आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. निदा खानने जर मला मदत मागितली असती तर कदाचित मिही तिला मदत केली असती. कारण आरोपी आणि गुन्हेगार यात फरक असतो, असंही जलील म्हणाले.

त्यांना काडीची किंमत देत नाही

पोलिसांनी एफआयआर दाखल केली असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. मी पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेईल. मी माझ्या माणसांकडूनही सर्व माहिती घेईल. परंतु, निदा खानला अटक झाली, तिला लपवून ठेवण्यात माझा हात आहे, असं समजणे चुकीचं आहे. मी पालकमंत्र्यांना काडीमात्र किंमत देत नाही. मला पोलीस जे काही विचारतील, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देईल. मी पोलिसांना सहकार्य करेन, अशी भूमिका जलील यांनी स्पष्ट केली.

follow us