छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांवर गुन्हा दाखल

AIMIM corporator Matin Patel Nida Khan नाशिक TCS प्रकरणात निदा खानला तसेच तिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

AIMIM Corporator Nida Khan

Case registered against AIMIM corporator Matin Patel for sheltering Nida Khan : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच तिला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी पोलिसांपासून लपण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यावर देखील नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर जनता दरबारच्या माध्यमातून अक्षय कर्डिले पुन्हा ॲक्टिव्ह

निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांखाली नाशिक पोलिसांनी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नासिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 249 अंतर्गत त्यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना सह आरोपी करण्यात आलेलं आहे. नाशिक पोलिसांनी टिसीएस प्रकरण समोर आल्यानंतर फरार असलेल्या निदा खानचा शोध सुरू केला होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांवर गुन्हा दाखल

त्यानंतर आता मात्र ती ती सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. पोलिसांच्या रडारवर असलेल्या निदा खानने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत अखेर तिचा ठावठिकाणा शोधून काढला. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये निदा खान लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला.

मंत्री सामंतांचा मोठा निर्णय! अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त

त्या वेळी निदा खान आपल्या आई-वडील, भाऊ आणि मावशीसह त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशीसाठी नाशिकला रवाना केलं. अटकेनंतर रात्री उशिरा तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र ती ज्या घरामध्ये लपून बसलेली होती. ते घर होतं छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचं त्यामुळे त्यांच्यावर देखील नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us