Pune News : नव्या वर्षाची सुरुवात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी पुण्यातून आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनकवडे आणि बाळा ओसवाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे. दुसरीकडे पक्षाला मात्र गळती लागली आहे. त्यामुळे पक्षासमोर अडचणी उभ्या राहत आहेत.
ठाकरेंना कोकणात धक्का? माजी आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत, कारण काय..
माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्यानंतर माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांचा देखील ठाकरे गटाला रामराम केला आहे. शिवसेनेतील कार्यपद्धतीवर नाराज होत ओसवाल यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. प्रिय शिवसैनिकांनो तुम्हाला वाईट वाटेल पण माझा निर्णय पक्का आहे, असं म्हणत ओसवाल यांनी पक्ष सोडला आहे. आतापर्यंत पाच जणांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यानंतर आणखी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते महादेव बाबर यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र याबाबत त्यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या नवीन वर्षात मी एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयात आपली भूमिका महत्वाची आहे. काही निर्णय घेताना त्रास होतो तसा मला ही झाला आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नाही की माझी शिवसेना मला सोडावी लागेल. परंतु शिवसेना का सोडतोय ? याला खूप कारणे आहेत. परंतु जाताना कोणालाही नाव ठेवून जायचे नाही यामध्ये माझी शिवसेना, माझे उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही इथे जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नकोय असे वाटायला लागले आणि यातूनच घुसमट चालू झाली. ना पुण्यात लोकसभेला जागा, ना ही विधानसभेला. आणि जागा मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे कोणतीही ताकत द्यायची नाही कोणतीही रसद पुरवायची नाही. ना कोणत्या शिवसैनिकाला कसलीही मदत करायची नाही ना कोणत्या शिवसैनिकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप आरएसएसवरही बंदी आणेल
ज्यांना शिवसेना वाढवायची आहे त्यांना काम करू दिलं जात नाही. संपर्कप्रमुखांच्या कानावर यासर्व गोष्टी असून सुद्धा ते काहीही करू शकले नाहीत. जे काहीही करू शकत नाही असे लोक संघटना चालवत आहेत, ज्यांचे खरे काम ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील पाच वर्षांत पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही. असो अशी बरीच कारणं आहेत परंतु आता कोणतीही कारणे न देता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे.