Download App

Pune Politics : माझ्या मित्राला म्हणत टिंगरेंनी ठेवलं मुळीकांच्या मर्मावर बोट!

पुणे : पुण्यातले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्यात चांगलंच वाक् युद्ध रंगल्याचं दिसून येत आहे. आमदार असताना जनतेचे प्रश्न सोडवले असते तर तुम्ही पुन्हा आमदार झाले असते, असा मार्मिक टोला राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी मुळीक यांना लगावला आहे.

परदेशातून दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची चर्चा; शरद पवारांचं केंद्रीय दुग्धमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

दरम्यान, विविध विकासकामांसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून निवदनं सादर केली पण अद्याप एकही प्रश्न प्रशासनाने मार्गी लावला नसल्याचा आरोप करत आमदार टिंगरे यांनी नागरिकांसह उपोषणाचा पवित्रा घेतलाय. टिंगरे म्हणाले, मी गेल्या चार वर्षांपासून आमदार असून अनेकदा शासन दरबारी विकासकामांबाबत शासन दरबारी आवाज उठविला मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

State Government cultural awards : ठरलं ! 2020-21 या वर्षाचे राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

यासंदर्भात विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला तरीही एकही प्रश्न प्रशासनाने मार्गी न लावल्याने उपोषणला बसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. एकीकडे पुण्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. नूकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी सुरु होती. अशातच पुण्यातले दोन आजी-माजी आमदारांत आरोप-प्रत्योराप सुरु झालेत.

जिथं शिवसेनेचा भगवा फडकला तिथं…; राऊतांनी इफ्तार पार्टीत केलं मोठं विधान

आमदार टिंगरेच्या आंदोलनाला जगदीश मुळीक यांनी हा एक स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सुनिल टिंगरेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. माझ्या मित्राला अद्याप वडगावशेरीचे प्रश्न माहितच नाहीत. तुम्ही पाच वर्षे सत्तेत होतात. शहराध्यक्ष होतात तुमची सत्ता होती. तेव्हाच जनतेचे हे प्रश्न तुम्ही सोडवले असते तर आज आमदार असता, या शब्दांत त्यांनी हल्लाबोल केलाय.

क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन

दरम्यान, तुम्ही जर जाऊन पहा, पुण्यात त्यांचे सहा आमदार आमचे दोन आमदार आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक फंड माझा नसेल तर यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचा इशारा आमदार टिंगरे यांनी मुळीक यांनी दिला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज