जिथं शिवसेनेचा भगवा फडकला तिथं…; राऊतांनी इफ्तार पार्टीत केलं मोठं विधान

जिथं शिवसेनेचा भगवा फडकला तिथं…; राऊतांनी इफ्तार पार्टीत केलं मोठं विधान

Sanjay Raut :  रमजानच्या महिन्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊते हे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला देश एकसंघ ठेवण्यासाठी एकत्रित राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत.

मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. आम्ही एकत्र होतो आणि एकत्रच निवडणुकीला सामोरे जाणार यासाठी हा खास  पैगाम देण्यासाठी इथे आलो आहे, असे राऊत म्हणाले आहे. सध्या देशाला तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या प्रकारे माहोल तयार केले जात.आम्ही यामध्ये फसणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

यावेळी काँग्रेसचे नेते मिलिंदे देवरा, नसीम खान तसेच गुजरातमधील काँग्रेसचे युवा आमदार जिग्नेश मेवानी हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात आम्ही मजबूत आहोत गुजरात मध्येही मजबूत होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला प्रेमाने ते बोलवलं तसंच प्रेम शेवटपर्यंत टिकू द्या. मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे, असे राऊतांनी सांगितले.

Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार

दरम्यान, ज्याला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, जिथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत राहिला,
तिथं आम्ही सगळे एक सोबत आहोत. जे काही गिले शिकवे आहे ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र लढू.
आम्ही सगळे सोबतच राहू आणि मुंबईला पुन्हा आम्ही सोबतच जिंकू, असे राऊतांनी सांगितले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube