Pune Rain Update: पुणे, पिंपरी-चिंचवड (Pune) आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान (IMD) ने पावसाचा रेडअलर्ट (Red Alert) जारी करण्यात आलाय. तर खडकवासला (Khadakwasala) धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे सध्या या धरणातून 27 हजार 000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडले जाईल. त्यामुळे पुण्याचा सखल भागात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.(Meteorological department’s red alert, discharge increased from Khadakwasal!)
‘…तर मी राजकारणातून संन्यास घेईन’; विखे पाटलांचे थोरातांना ओपन चॅलेंज
महत्त्वाची अपडेट :
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे.
खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2024
या परिस्थितीची सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे. सर्व जिल्हाधिकार्यांशी सुद्धा सिंचन विभाग संपर्कात असून, जिल्हाधिकार्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्वच विभाग समन्वयाने स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. तथापि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्यावर नाचताना पाहिले तेव्हा मला दु:ख…; फडणवीसांची बोचरी टीका
सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास
डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे शंभर वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये दोन सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने 15 वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
3rd Aug: IMD ने पुढील 4,5 दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार+ पावसाचा इशारा जारी केला आहे.☔
📌 पुढील 24 ते 48 तास #मध्यमहाराष्ट्रातील #घाट भागात आणि #कोकणात वरच्या स्तरावरील सतर्कतेची शक्यता आहे. pic.twitter.com/VgOOzn5zml— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 3, 2024
पुढे चार पाच दिवस मुसळधार पाऊस
पुढील 4 – 5 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 24 ते 48 तासात मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात सतर्कतेची इशारा देण्यात आलाय. पुणे, सातारा, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली.
गेल्या आठवड्यात पुणे शहराला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये जास्त पाणी सोडण्यात आल्याने नदी पात्राच्या बाजूच्या भागात पाणी शिरले होते. त्यामुळे अनेकांना पुराच्या पाण्यात अडकावले लागले होते. तर पुरामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. पुण्याच्या पुरावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते.
https://youtu.be/eW9tO2G8bm8?si=jfYSOEuhaME3Rwjj