Pune News : पुण्यात स्टंट करत रिल्स बनवणाऱ्या प्रसिद्ध टिकटॉक स्टारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Pune Accident  :  सध्या अनेक तरूणांमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवून ते अपलोड करण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, हीच क्रेझ एका महिलेच्या जीवावर उठली आहे. स्टंट करत रिल्स बनवण्याच्या नादात प्रसिद्ध टिकटॉक स्टारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मंमदवाडी परिसरात घडली आहे. ही धडक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 08T131512.088

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 08T131512.088

Pune Accident  :  सध्या अनेक तरूणांमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवून ते अपलोड करण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, हीच क्रेझ एका महिलेच्या जीवावर उठली आहे. स्टंट करत रिल्स बनवण्याच्या नादात प्रसिद्ध टिकटॉक स्टारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मंमदवाडी परिसरात घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

तस्लिम फिरोज पठाण असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात महंमदवाडी येथे 6 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.या प्रकरणी पोलिसांनी आयान शहानुर शेख आणि झाइद जावेद शेख या दोन रिल्स बनवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झाइद हे दोघे बाईकवरून जात असताना रिल्स बनवत होते.

त्यावेळी घरी परतणाऱ्या पठाण यांच्या दुचाकीला आयान आणि झाइद यांच्या गाडीची धडक बसली. घटनेवेळी शेख हा गाडी चालवत होता. तर, झाइद हा व्हिडिओ काढत होता. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथे फारशी रहदारी नसते. त्यामुळे आयान आणि झाइद हे दुचाकी चालवताना स्टंट करत रिल्स बनवत होते. त्यावेळी पठान यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. ज्यात पठान यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आयान आणि झाइद यांनी पळ काढला.

Sanjay Raut : मोदी शाहांच्या मदतीने देश लुटणाऱ्या अदानींना साधी नोटीसही नाही; राऊतांचा हल्लाबोल

तपासात रिल्स बनवताना हा अपघात घडल्याचे समोर आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, तरूणांमध्ये वाढती रिल्सची क्रेझ एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतल्याने तरूणांना या जाळ्यातून वेळीस बाहेर काढणे अत्यंत गरजेचे झाले आहे हेच या घटनेवरून अधोरेखित होत आहे.

Exit mobile version