Download App

संभाजी भिडे चोख पोलीस बंदोबस्तात पालखी मार्गावर

Sambhaji Bhide On Palkhi Marg : जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Saint Dnyaneshwar Maharaj)पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे (Shivpratisthan)संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हजारो अनुयायांसह शिवाजीनगर (Shivajinagar)रस्त्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भिडे यांच्या बंदोबस्तासाठी 100 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. (pune-sambhaji-bhide-on-palkhi-marg-police-protection)

Maharashtra Politics : भाजप CM शिंदेच्या मुलाला का करतयं टार्गेट?; राष्ट्रवादीनं शोधलं उत्तर

यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवल्याचे पाहायला मिळाले. काहीच वेळात या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला अर्धा ते एक तास लागू शकतो.

अमोल कोल्हेंना प्रश्न विचारणं माजी सरपंचाला पडलं महागात; पोलिसांनी तब्बल 5 तास ठेवलं डांबून

दरम्यान, भिडे हे दरवर्षीच पालखीच्या दर्शनासाठी येत असतात मात्र यंदा मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्याभोवती असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी संभाजी भिडेंसोबत हजारो अनुयायी डोक्यावर भगवे फेटे बांधून या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनुयायांनी सियावर रामचंद्र की जय, रामभक्त हनुमान की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच भिडेंनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका, असं वक्तव्य केलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही हिंदू पंचागाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे, असंही आवाहन संभाजी भिडेंनी केलं होतं.

Tags

follow us