Download App

Pune Scam : जास्त व्याजाचे अमिष भोवले; गुंतवणूकदारांची सातशे कोटींची फसवणूक !

  • Written By: Last Updated:

Pune Scam : जास्त व्याज देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे. राज्यात असे अनेक प्रकार घडत आहे. आता पुण्यात गुंतवणूकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल सातशे कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत विशाल फटे याने तब्बल पाचशे कोटींच्या फसवणूक केली होती. त्याची पुनरावृ्त्ती आता पुण्यात झाली आहे.


अंबानींना दर महिन्याला मिळणार एवढे पैसे, अ‍ॅपल स्टोअरचे भाडे ऐकून व्हाल थक्क!>

पुण्यातील बाणेर येथे एपीएस या खासगी शेअर मार्केट कंपनीत 2011 लोक गुंतवणूक करत होते. अविनाश अर्जुन राठोड याची ही कंपनी आहे. शेअर मार्केट कंपनीतील गुंतवणुकीची स्कीम राठोड याची होती. महिन्याला पाच टक्के मूळ रक्कम व पाच टक्के व्याज असे एकत्रित मिळून दरमहा दहा टक्के, तर २० महिन्यांत दामदुप्पट पैसे देण्याचा बहाणा ही कंपनी करत होती.

क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर

काही जणांना चांगला मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे या कंपनीमध्ये गुंतवणूकही वाढली होती. पण काही दिवसांपूर्वी परतावा घेण्यासाठी काही गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात गेले होते. पण कार्यालय बंद होते. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केले होते. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी राठोडविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कंपनी पुणे व इतर जिल्ह्यात कार्यरत होती. या कंपनीत तब्बल सातशे कोटी रुपयांचा गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे. ही रक्कम घेऊन आरोपी हा पसार झाला आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्हयातील बार्शी शहरात शेअर बाजार गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक झाली होती. ही फसवणूक पाचशे कोटींच्या आसपास होती. यात विशाल फटे याला अटक झालेली असून, तो तुरंगात आहे.

Tags

follow us