Snake Entered In Front Of Stage Where The Union Minister & CM Fadnavis Will Sit In Pune : पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मंत्री एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असताना एक मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. ज्या मंचावर केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्या मंचासमोर साप (Snake) आढळून आला. त्यामुळे काहीकाळा या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरी चिंचवडजवळील किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज सहावा दीक्षांत समारंभात ही घटना घडली.
फडणवीस गेटसमोर अन्…
मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री ज्या ठिकाणी बसणार होते त्या मंचाजवळच हा साप आढळून आला. मुख्यमंत्र्यांचा ताफा त्याचवेळी घटनास्थळी दाखल झाला होता. त्याचवेळी सभागृहातील मंचासमोर साप आढळून आला. मात्र, त्याला पकडण्याच्या आताच सापानं मान्यवर बसणार त्या स्टेजखाली एन्ट्री घेतली. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मंचावर बसण्याआधी सापाला शोधण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर उभे राहिले. सध्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सुरळित सुरू आहे. मात्र, कार्यक्रमापूर्वी आढळून आलेला साप सापडला की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ कार्यक्रमापूर्वी नाराज
सिम्बॉयसिस येथील कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री माधुरी मिसाळ यादेखील उपस्थित आहेत. मात्र, कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी ज्या पद्धतीने राज्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलनुसार मिसाळ यांचे स्वागत होणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. मिसाळ ज्यावेळी कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या त्यावेळी त्यांना रिझिव्ह करण्यासाठी एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. यामुळे मिसाळांनी नाराजी व्यक्त केली. Snake Entered In Front Of Stage
राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा अवमान
या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) सिम्बॉयसिस विद्यापीठात दाखल झाल्यानंतर प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाकडून मिसाळ यांना गेटवर स्वागत करण्यासाठी कोणीही आले नाही. यामुळे राज्यमंत्री माधुरी मिसाळ चांगल्याच संतापल्या. राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा सिम्बॉयसिस प्रशासनाने अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती होती.
LIVE | Attending the Convocation Ceremony of Symbiosis Skills & Professional University, Pune, and the launch of the School of Defence & Aerospace Technology, along with Hon Raksha Mantri Rajnath Singh Ji.
🕦11.26am | 16-10-2025📍Pune.@rajnathsingh https://t.co/PIwo2TeP3h
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2025