Download App

वर्कलोड, भेदभाव अन्.. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याची पोस्ट वाचल्यानंतर बसेल धक्का!

पुण्यातील नामांकीत आयटी कंपनी इन्फोसिस कंपनीतील कर्मचारी भूपेंद्र विश्वकर्मा याने सोशल मीडियावर राजीनामा देण्याची कारण सांगितली.

Pune News : पुण्यातील नामांकीत आयटी कंपनी इन्फोसिसमधून एक बातमी आहे. कंपनीतील एक कर्मचारी भूपेंद्र विश्वकर्मा. घरात एकमेव कमावता व्यक्ती. तरीदेखील त्याने कंपनीतील नोकरी सोडली. आता त्याने इतका चांगला जॉब का सोडला? भूपेंद्रने खरंच राजीनामा दिला की त्याला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. पण, राजीनामा का दिला याची सहा कारणं मात्र त्यानं दिली आहेत. त्याची हीच पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये भूपेंद्र विश्वकर्माने नेमकं काय म्हटलंय हे पाहू या..

कंपनीत काम करत असताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे मला दुसरा कोणताही जॉब हातात नसताना राजीनामा द्यावा लागला. आता या समस्यांबद्दल मला मोकळेपणाने काही गोष्टी मांडायच्या आहेत असे भूपेंद्रने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राजीनामा देण्याची कारणं काय?

नोकरीचा राजीनामा देण्यामागची कारणं काय आहेत याचा खुलासा करताना भूपेंद्र म्हणतो, कंपनीत सिस्टीम इंजिनिअर ते वरिष्ठ सिस्टीम इंजिनिअर अशी पदोन्नती मला पगारवाढी शिवाय मिळाली. तीन वर्षे कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही कोणतेही पारितोषिक मिळालं नाही. तीन वर्षे कठोर मेहनत घेतली, अपेक्षा पूर्ण केल्या तरीही माझ्या प्रयत्नांची दखल घेतली गेली नाही.

ज्यावेळी त्याची टीम 50 वरून 30 सदस्यांपर्यंत मर्यादीत झाली त्यावेळी अतिरिक्त कामाचा भार टाकण्यात आला. कोणत्याही नवीन नियुक्त्या केल्या नाहीत. प्रोत्साहनही मिळालं नाही. कोणत्याही मोबदल्याशिवाय फक्त कामाचा ताण वाढवण्यात आला. जादा कामाचा मोबदला मिळाला नाहीच असे भूपेंद्रने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय सांगता! क्रेडिट कार्डमुळेही होते पैशांची बचत; ‘या’ टीप्स करतील मोठी मदत

तोट्यात चाललेल्या खात्यात काही सुधारणा होईल अशी शक्यता भूपेंद्रला वाटली नाही. मर्यादीत पगारवाढ आणि भवितव्याबाबत अस्पष्टता यांमुळे प्रोफेशनल डेडवेट असल्यासारखं वाटू लागलं. मला जो विभाग दिला गेला होता तो मुळातच तोट्यात होता. माझ्या व्यवस्थापकाने देखील ही गोष्ट मान्य केली होती. याचा थेट परिणाम पगारवाढ आणि करिअर वाढीच्या संधींवर होतो.

कंपनीच्या क्लायंटच्या अवास्तव अपेक्षा आणि तत्काळ प्रतिसाद मिळावा अशी वृत्ती यांमुळे येथे दबावाचं वातावरण तयार झालं. किरकोळ मुद्द्यांवर होणाऱ्या वाढीमुळे एक प्रकारची विषारी कार्यसंस्कृती येथे तयार झाली होती. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. हा दबाव कमी झाला पण पदानुक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर तणाव निर्माण झाला असेही भूपेंद्र म्हणाला.

सहकारी आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळाली. परंतु, याचं रुपांतर पदोन्नती, पगारवाढ किंवा करिअरची प्रगती अशा गोष्टींत झालं नाही. आपल्या मेहनतीचं फळ मिळण्याऐवजी शोषण होत असल्याची भावना भूपेंद्रच्या मनात तयार झाली.

भूपेंद्रने दावा केला की ऑनसाइट रोल गुणवत्तेवर आधारीत नाही. विशिष्ट भाषा बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं आणि माझ्यासारख्या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांना बाजूला केलं गेलं. तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषिक कर्मचाऱ्यांना अशा रोलसाठी सातत्याने प्राधान्य दिलं गेलं. आमच्या कामगिरीकडे माझ्यासारख्या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं असा दावा भूपेंद्रने या पोस्टमध्ये केला आहे.

झोपता झोपता AI च्या मदतीने 1,000 नोकऱ्यांसाठी अर्ज अन् सकाळी घडलं असं काही …

दरम्यान, भूपेंद्रने ही पोस्ट त्याचा लिंक्डइन अकाउंटवरून शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी भूपेंद्रच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या काहींनी मात्र या विरोधात मते नोंदवली.

follow us