Vijay Vadettiwar Exclusive : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 40 टक्के कमिशनने गोळा केलेला पैसा मोठ्या चलाखीने भाजपने वापरला आहे असा थेट घणाघात करत, येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजनेच काय होणार (Vadettiwar) यावरही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट भाष्य केलं आहे. ते लेट्सअप मराठीवर विशेष कार्यक्रमात बोलत होते.
आज महाराष्ट्र भिकारी करून ठेवलाय असा थेट हल्ला करत सामाजिक न्याय विभागाची काय अवस्था झाली आपण पाहताय असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लाडकी बहीण योजना चालू आहे. ती निवडणूक ती पार पडली की ही योजना बंद होणार असा थेट दावाच वडेट्टीवार यांनी केला आहे. या योजनेमुळं अनेक विभागांचा निधी कापला असून अनेक विभागांचा निधीच थांबवला आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात, विजय वडेट्टीवारांची मागणी
सामाजिक न्याय विभागाला खऱ्या अर्थाने 28 हजार कोटींचा निधी असला पाहिजे. तो आणलाय 15 हजार कोटींवर असं म्हणत त्यातंही हे सर्व मिळून 8 ते 10 हजार कोटीच खर्च करतात असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, त्यांनी भाजपचे ज्येष्ट नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही भाष्य केलं. मुनगंटीवार इतके ज्येष्ठ नेते असून त्यांची अवस्था ही एकनाथ खडसे यांच्यासारखी केल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत नसताना वेगळ्या विदर्भाची मागणी करत होते. मात्र, ते आता करत नाहीत आणि तुम्हीही त्यांच्याकडे तसं काही म्हणत नाहीत असं विचारल्यावर वडेट्टीवार म्हणाले आमची ती मागणी नव्हती. पण, फडणवीस यांनी मात्र ती मागणी केली होती. परंतु, त्यांना आता महाराष्ट्राची सत्ता समोर दिसत असल्याने त्यांना वेगळ्या विदर्भाचा विसर पडला. सत्तेतून बाहेर गेले की त्यांना वेगळ्या विदर्भाची आठवण होईल असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.