Pune Traffic : पुण्यात पावसामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहने एक तास-दोन तास एकाच जागेवर अडकून पडतात. अनेकदा वाहने रस्त्यावर सोडून प्रवासी पायी घरी जातात. ही समस्या दररोजची आहे. तर अभिनेता सागर तळाशीकरला (Sagar Talashikar) पुण्यातील वाहतूक कोंडीचा भयानक अनुभव आला आहे. हा अभिनेता हा आपल्या कारमध्ये तब्बल पाच ते सहा तास अडकून पडला होता. ते एकटाच नव्हता, त्याच्याबरोबर त्याची आई होती. तिचr नुकतीच एक शस्त्रक्रिया झालेली आहे. तिला औषध व जेवणही मिळाले नाही. तिचे प्रचंड हाल झाले आहेत. (pune traffic actor sagar talashikar stuck)
Shiv Rajyabhishek Logo : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण
पुण्यातील ट्र्रॅफिक जॅमचे परिस्थिती सागर तळाशीकर यांनी फेसबुक लाइव्हमधून सांगितली आहे. अभिनेता सागर तळाशीकर हा कारने आईसह कोल्हापूरहून सकाळी पुण्याला येण्यासाठी निघाला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दरी पुलाजवळ तो आला. तेथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वारजेच्या अलिकडच्या पुलाजवळ पोहचण्यासाठी पावणेदोन वाजले होते. त्यानंतर मात्र वाहने पुढे जात नव्हतेी. दुपारी दोन ते रात्री सातवाजेपर्यंत कार एकाच जागेवर थांबली होती. सकाळी आठ वाजल्यापासून तो व आई हे गाडीमध्ये बसलेले होते. त्यामुळे आईला दुपारचे जेवण व औषध मिळाले नसल्याचे त्याने सांगितले.
अजित पवारच मुख्यमंत्री होणार! पृथ्वीराज चव्हाणांनी थेट तारिखच सांगितली
तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. परंतु पाच तासात कुठेलीही यंत्रणाही आली नाही. याला कोण जबाबदार आहे. लोकांचे हाल होत आहेत. त्याच्यासाठी काय करणार आहे. म्हातारी लोक असतात. व्याधीग्रस्त असलेले लोक आहेत. पुणे वाहतूक पोलिस, पुणे महानगरपालिकेने याची जबाबदारी घेऊन काही तरी केले पाहिजे, असे तो संयमीतपणे सांगत आहे. रात्री आठनंतर तो बहिणीच्या घरी पोहचल्याचे त्याने फेसबुकवर सांगितले आहे.