Pune University : विद्यापीठ चौकातून प्रवास करणाऱ्यांनी ‘या’ बदलाकडे लक्ष द्या 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) […]

Flyover University

Flyover University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Pune University) ते गणेशखिंड रस्त्यालगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेड्सची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे (PMRDA) उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) यांनी केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. या प्रकल्पाच्या भाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते गणेशखिंड रस्ता लगत मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे काम मुख्य चौकापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२३ अखेर पासून मुख्य चौक आणि रस्त्यालगत सुरक्षा बॅरिकेडची रुंदी वाढविण्यात येणार आहे.

विद्यापीठ चौकातील हा बदल लक्षात घेऊन या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील रहिवासी, नागरिकांना पूर्वसूचना पीएमआरडीए देण्यात येत आहे, पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

विद्यापीठ चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी येथे पीएमआरडीएच्यावतीने दुमजली उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सर्वात वरून मेट्रो तर त्याखालून दुचाकी आणि चारचाकी वाहनाना वेगाने प्रवास करता येणार आहे.

Pathaan Review | शाहरुख फॅन्ससाठी ट्रीट | LetsUpp

Exit mobile version