Download App

बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केली आहे अवस्था पुण्याची?

  • Written By: Last Updated:

Pune Rain News : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरात विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. एका अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचे वाभाडेच काढले आहे. त्यामुळे बघा पुणे स्मार्ट सिटी झाले का? काय होते पुणे काय केले आहे अवस्था पुण्याची झाली आहे, असेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे.

गुरुवारी (दि. १३) रोजी अवकाळी पावसामुळे पुण्याच्या वाहतुकीची कोंडी झाली असून पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहे.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली कुठेही पाणी वाहून नेण्याची गटारे नाहीत. सिमेंटचे रस्ते करताना तशी जागाच ठेवलेली नाही. रस्ते छोटे केले आहेत. फूटपाथ मोठे केले. सायकली लोकं वापरात नाहीत, तरी वेगळा ट्रॅक का ठेवला जातो, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होते.

देसाईंचा लोढावर हल्ला : ही काय बिल्डिंगची स्कीम नाही की ज्याला तुम्ही नद्यांची नावे देताय… – Letsupp

चांदणी चौक ते भारतीनगर चौक, कर्वेनगर ते डेक्कन, डेक्कन ते शिवाजीनगर आणि संचेती हॉस्पिटल ते जंगली महाराज रस्ता अशा सगळ्याच भागात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी कार्यालय सुटण्याची वेळ असल्याने आणि नेमक्या त्याच वेळी अवकाळी पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांची त्रेधातिरपीट झाली.

सिमेंट रस्ते, फुटपाथ बनवताना गटारी पूर्णतः बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर गुडगाभर पाणी रस्त्यावर साचले होते. या पाण्यात दुचाकी, चारचाकी वाहने पाणी गेल्याने बंद पडली. परिणाम भरपावसात पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांबरोबरच नागरिकांना प्रचंड त्रास झाला.

Tags

follow us